रस्ते सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत पनवेलसह खांदा वसाहत येते करण्यात आली जनजागृती

trafic-police
पनवेल (संजय कदम) : रस्ता सुरक्षा अभियान २०२३ सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल, नवी मुंबई, उरण यांसह विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहरातील पंचमुखी सिग्नल, नवीन पनवेल सिग्नल, एचडीएफसी सर्कल व खांदा वसाहत येथे वाहतुकीचे नियम पाळण्यासाबाबत जनजागृती करण्यात आली.
रस्ते अपघात वाहतुकीचे नियम न पाळले गेल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सप्तहामध्ये वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहतूक शाखे तर्फे पनवेल शहरातील पंचमुखी सिग्नल, नवीन पनवेल सिग्नल, एचडीएफसी सर्कल व खांदा वसाहत येथे वाहतुकीचे नियम पाळण्यासाबाबत जनजागृती करण्यात आली.
या मध्ये वाहनचालकांना सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान करून गाडी न चालवणे यांसाख्या गोष्टी पथनाट्य आणि फलकांच्या माध्यमातून समजावण्यात आल्या. या रास्ता सुरक्षा अभियान संदर्भात पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे व त्यांचे पथक त्याचप्रमाणे कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंके व पोलीस उपनिरीक्षक मोहन मुळीक यांनी हेल्मेट वापरा संदर्भात अधिक माहिती देत वाहतुकीचे नियम सर्वानी पाळावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *