कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील कर्जत लगत असलेल्या पूर्व भागातील 40 गावातील 2000हेक्टर जमीन राजनाला कालव्याच्या पाण्यावर ओलिताखाली येत असते. या कालव्यात 26 डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून त्याचा परिणाम पेज नदी आणि पुढे उल्हास नदी मधून वाहणाऱ्या पाण्याचा पातळी खाली गेली आहे. दरम्यान,नदीतील पाण्याची पातळी खालावली असल्याने उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या नळपाणी योजना या अडचणीत आल्या असून पुढील दोन दिवसात नदीमधील पाण्याची पातळी जैसे थे होईल असा विश्वास पाटबंधारे विभाग यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
२६ डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याला पाणी सोडण्यात आले आणि त्याचा परिणाम पेज नदी तसेच उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये त्याचा परिणाम झाला.त्यामुळे उल्हास नदीवरील तीरावर असलेल्या असनेक नळपाणी योजना यांची पाण्याची पातळी खाली आली आणि त्यामुळे नदीच्या तीरावर असलेल्या अनेक नळपाणी योजना या पाणी पुरवठा करण्यात कमी पडल्या. त्यात नेरळ आणि माथेरान सारख्या नळपाणी योजना तर अडचणीत आल्या असून नेरळ ग्रामपन्चायत ने या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपल्या सर्व कर्मचारी वर्गासह जाऊन २७ आणि २८ डिसेंबर नदीमध्ये बांधा घालून आजूबाजूने जाणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. नेरळ गावात दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून ग्रामस्थांनी ट्रँकर मागवून पाण्याची तहान भागवली आहे. तर राजनाला कालव्याच्या सर्व भागात पाणी पोहचण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर कालव्यातील पाणी शेतात पोहचल्यानंतर पुढे पेज नदी आणि उल्हास नदीची पाण्याची पातळी स्थिर होत असते.