राजेंद्र ज्वेलर्स मालकाच्या खून प्रकरणी कशेळे व्यापारी संघटनेच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून केला निषेध

kashele-rajput
कर्जत (गणेश पवार) : कशेळे येथे हरिश राजपूत याचे राजेंद्र ज्वेलर्स दुकान मालिका चा खून प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेच्या व स्थानिकांनी पण एक दिवस बंद ठेवून स्वर्गीय हरिश माधाशिंग राजपूत याची आठवर्णीना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली तसेच आरोपीला पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी व्यापारी संघटने केली आहे.
नेरळ जिते गावाच्या हद्दीत ३ डिसेंबर रोजी कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स मालक हरीश राजपूत संध्याकाळी सातच्या दरम्यान आपल्या घरी परतीच्या वेळेस कशाला नेलं राज्यमार्गावर जिथे गावाच्या हद्दीत हरीश हरीश राजपूत यांची मोटरसायकल अडवून त्यांच्या शरीरावर आठ ठिकाणी चकू खूपसून निर्धरपणे हत्या केली होती आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता याबाबत कशाळ येथे व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घडलेल्या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे
हरीश राजपूत हा साधा भोळा हसतमुख मनमिळावू स्वभावाचे राहिलेला हरीश राजपूत यांच्यावर घडलेला या प्रकरणाचा निषेधार्थ म्हणून कशेळे येथील सर्व व्यापारी संघटना सहा डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरले होते.  यावेळी स्वर्गीय हरीश राजपूत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कॅन्डल पेटून राजपूत यांच्या बाबतीची आठवणीला नागरिकांनी उजाळादेत श्रद्धांजली वाहिली, या प्रकरणात निषेध नोंदविण्यासाठी सात डिसेंबर रोजी संपूर्ण व्यापार अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आले तसेच पोलिसांनी अशा आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *