उरण (विठ्ठल ममताबादे) : रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र (मुंबई), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाच मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे अध्यक्ष सदानंद रामचंद्र निंबरे व सचिव सुभाष गोकुळ पाटील यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला आहे.
मुले : साकिब शेख (५४ किलो खालील), विकास राजू केवट (५८ किलो खालील), मोहमदकैब अलमगीर शेख (६३ किलो खालील), रोहित कांबळे (६८ किलो खालील), आर्या विनोद घाग (७४ किलो खालील), प्रसाद भगवान जायभये (८० किलो खालील), वेदांत व्ही दरेकर (८७ किलो खालील), दर्शन नाईक (८७ किलो वरील),
या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पोन्डेचरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.