राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

wine-chor
पनवेल (संजय कदम) : राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल जवळील मौजे कोपरा गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या सायन -पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक एक वर एक ट्र्क अडवून त्याच्या द्वारे अवैध मद्याचा साठा ७६,७७,८४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती.
त्याच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर , दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे , शिवाजी गायकवाड , सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव, जवान विलास चव्हाण, महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तेथे असलेल्या पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूस संशयित ट्रक क्रमांक जीजे – ०६ – बीटी – ९७१७ यास अडवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या बाटल्या असे एकूण अवैध गोवा मद्याचे ८९८ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी संदीप पंडित (वय ३८) ट्रक चालक व समाधान धर्माधिकारी (वय ३०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्या वर पुढील कारवाई करण्यात आल्या.
—————————————
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९ व व्हाट्सअप क्रमांक ८६२२००११३३ तसेच फोन नंबर – ०२२ -२२६३८८१ वर संपर्क साधावा
—श्रीमती कीर्ती शेडगे ( अधीक्षक. राज्य उत्पादन शुल्क ,रायगड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *