नागोठणे (महेंद्र माने) : रोहा तालुक्यातील वाडा आमडोशी ठाकुरवाडी (उनाठावाडी) येथे 11 ते 15 जानेवारी दरम्यान रायगड आदिवासी ठाकुर / कातकरी समाज या समाजाच्या ओपन क्रिकेट स्पर्धा श्री माणकेश्वर महाराज चषक 2023 चे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी आ.अनिकेत तटकरे यांनी गुरुवार 12 जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली.
या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन 11 जानेवारी रोजी नागोठणे विभाग रा.कॉ.युवक अध्यक्ष प्रमोद जांबेकर,चंद्रकांत जांबेकर,प्रभाकर ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सहा दिवस चालणार्या या स्पर्धेला आ. अनिकेत तटकरे यांनी गुरुवार 12 जानेवारी रोजी सदिच्छा भेट देऊन उपस्थित संघांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रा.कॉ.जेष्ठ नेते भाई टके, पेण विधानसभा रा.कॉ.उपाध्यक्ष विलास चौलकर, पिगोंडा सरपंच संतोष कोळी, रा.कॉ. रा.जि. युवक सरचिटणीस विनायक गोळे,अध्यक्ष नागोठणे विभाग प्रमोद जांभेकर यांच्यासह चंद्रकांत जांबेकर, प्रभाकर ठाकूर,मयूर खैरे,दिपेंद्र आवाद,निवास पवार,शरद कामथे,प्रमोद भोसले,राजू जांबेकर,महेंद्र हंबीर,राकेश शिंदे मच्छिंद्र लेंडी, दिनेश घाग, मोरेश्वर तेलंगे तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी आ.तटकरे यांनी उपस्थित संघांना मार्गदर्शन करून शूभेच्छा दिल्याची माहिती प्रमोद जांबेकर यांनी दिली. येथील आदिवासी ग्रामस्थांनी सदरील कार्यक्रमाला आ.अनिकेत तटकरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही सदैव ऋणी असल्याचे सांगितले.