रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज संघटनेची समाज एकजुटीसाठी कोलाड येथे सभा

telee-samaj
माणगांव (रविंद्र कुवेसकर) : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेच्या वतीने तेली समाज संघटन बांधणीसाठी ग्रामीण विभाग समाज बांधवांच्या उपस्थितीत रविवार दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते सहा वाजता, आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालय कोलाड तालुका रोहा येथे विशेष सभा झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र वाचकवडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन संत शिरोमणी संताजी महाराज प्रतिमेस पुष्षमाला अर्पण केली. यावेळी रोहा,अलिबाग, श्रीवर्धन, माणगांव, महाड वेळास येथुन अनेक तेली समाजबांधव उपस्थित होते. यावेळी संघटनेची ध्येय धोरणे, एकजूट आदी विषयांवर चर्चा झाली. तेली समाज जिल्ह्यात एकजुट रहावा, संघटनात्मक भेदाने तो विभागला न जाता एकत्रच असावा, कारण शेवटी आपण सर्व तेली समाजाचेच घटक आहोत.
नातीगोती व सगेसोयऱ्या संबधांनी एकत्र बांधले गेलो आहोत. त्यामुळे कोणताही प्रांत, जिल्हा असा भेदभाव न करता तेली म्हणुन एकत्र संघटना संलग्न होऊनच कार्य करावे. अशा प्रकारची स्पष्ट मतं समाज बांधवानी मांडत या सभेत आपले विचार व्यक्त केले. याला कारण महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज संघटनेने रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे येत्या ११ डिसेंबर २०२२ रोजी तेली समाज मेळाव्याचे भव्य आयोजन केले असुन संघटनेच्या माध्यमातुन उपक्रम राबविताना जिल्ह्यातील सर्वच तेली समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
दोन संघटनांमुळे समाज बांधवामध्ये सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. दोन्ही समाज संघटना आपल्याच आहेत. कोणी दूराग्रह निर्माण करीत असतिल तर त्यांना वेळीच समज देऊन संघटनेच्या जाणकार पदाधिकाऱ्यांनी उच्च स्तरावर एकत्रीत येऊन हा प्रकार सामंजस्याने मिटवावा. असे मत सर्वच समाज बांधवांनी व्यक्त केले आहे. सन १९३७ पासून कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील स्थानिक मुळचे कोकणस्थ तेली समाज संघटन मजबूत करण्यात त्या काळी काही अडचणी होत्या परंतु आता नव्याने हे संघटन मजबूत करण्यासाठी सर्व तेली समाज बांधव, महिला, युवावर्ग यांना एकत्रित करून आणखीन चांगले उपक्रम व मेळावे आयोजित करून जिल्ह्यात सर्वदूर जोमाने कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोलाडचे महेंद्र रामशेट वाचकवडे यांची निवड करण्यात आली होती तर कार्यक्रम सफल करण्यासाठी सौ. कांचन महेंद्र वाचकवडे माजी सरपंचा कोलाड तसेच हेमंत तार्लेकर यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबई ठाणे येथून आलेले रा.जि.को.तेली समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष-संतोष राजाराम रहाटे, सचिव-गजानन दत्ताराम शिंदे यांनी योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य तसेच दोन तालुक्यातील विशेषतहा अलिबाग बेलोसी येथुन समाज बांधव उपस्थित होते. संघटनेच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *