रायगड जिल्हा चर्मकार समाजाची सभा संपन्न

bc
कोलाड (श्याम लोखंडे) : चर्मकार समाज बांधवांनी संघटीत राहिले पाहिजे, संघटित राहूनच समाजाची प्रगती साधता येईल, बाबासाहेबांचे विचार व शिकवण अमलात आणून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूयात असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष नंदू तळकर यांनी केले. कोलाड तालुका रोहा येथे संपन्न झालेल्या रायगड जिल्हा चर्मकार समाजाच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भूतपूर्व अध्यक्ष अरविंद सावळेकर, जिल्हा सरचिटणीस राकेश केळकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आंबडकर व राजेंद्र जमदाडे, सहचिटणीस दिलीप पाबरेकर, रोहा तालुका अध्यक्ष समीर नागोठकर, ज्येष्ठ कृष्णा गायकवाड, रामनाथ आंबोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत मागील काळातील विविध घडामोडींचा आढावा घेत त्यावर विचारविनिमय करण्यात आले, नवीन वर्षातिल कामकाजाच्या प्रयोजनामध्ये काही प्रलंबित असलेल्या मागील गोष्टींचा पाठपुरावा करून त्याची पूर्तता वेळेचे बंधन ठेऊन पुढील सहा महिन्यांत करून घेण्याचे महत्वपूर्ण निर्णय यासभेत घेण्यात आले. त्यासोबत इतरकाही महत्वाच्या विषयांवर साधक बाधक चर्चा करून काही ठराव संमत करण्यात आले.
यावेळी सभासदांनी मोठ्या संख्येने चर्चेमध्ये सहभाग नोंदविला. सभेच्या प्रारंभी मागील वर्षांत स्वर्गवास झालेले जिल्हा समाजाचे उपाध्यक्ष कै. परशुराम भागोजी तळकर, कै. मारुती कानू तळकर तळा, कै. गणेश दाजी चिपळूणकर निवी रोहा, कै. पार्वती चांगु नांदगावकर मांडला मुरुड, कै. रोषण सिताराम केळकर, कै. सीताबाई केळकर उरण, कै. रामचंद्र गणपत बोंबले नेरळ, कै. सोनल आंबेतकर म्हसळा आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून पनवेल सहकारी अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याने भूतपूर्व अध्यक्ष अरविंद सावळेकर, अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेले मिलिंद अष्टीवकर, जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले दिलीप पाबरेकर, जामगाव रोहा सरपंचपदी निवड झालेल्या सौ. दर्शना प्रशांत म्हशीलकर, नांदवी माणगाव सरपंचपदी निवड झालेल्या सौ. वनिता विष्णू नांदवीकर, गोरेगाव ग्रा.प. सदस्य चंद्रकांत गोरेगावकर, वेंणगाव कर्जत ग्रा. प. सदस्य दिनेश दत्ता गायकवाड, आदर्श शिक्षक दिलीप सोपान घोले, गजानन बोंबे आदींचे समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आले. यासभेच्या नियोजनामध्ये रोहा तालुका पदाधिकारी गणेश चांदोरकर, संजय पालकर, राजन बिरवाडकर, रूपेश नांदगावकर, उमेश चिपळूणकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *