अलिबाग : कोराना व्हायरस महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून यामधून सणसूद देखील सुटलेले नाहीत. इतरवेळी मोठ्या उत्साहात साजरे होणार्या सणांवर कोरोना संकटाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी कोरोनामुळे सुमारे 700 दहीहंड्या रद्द केल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने अतिशय कठोर दिशानिर्देश जारी केलले असल्याने सण साजरे करणे अवघड होऊन बसले आहेत, तसेच लोकही आपली काळजी घेत असल्याने सणांचा उत्साह मावळल्याचे दिसत आहे. दरवषी मोठ्याप्रमाणात साजरा होणारा दहीहंडीचा सण सुद्धा यातून सुटलेला नाही. यावषी दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी रद्द केल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने हा निर्णय गोविंदांसह सर्वांच्याच दृष्टीने योग्य असल्याचे म्हटले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, रोहा, महाड आदी ठिकाणी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मानाच्या दहीहंडी बांधण्यात येतात, या हंड्या फोडण्यासाठी मुंबईसह अनेक ठिकाणांहून दहीहंडी पथके येत असतात. मात्र, कोरानामुळे हा सण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार नसला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून 11 पोलीस अधिकारी, 180 पोलीस कर्मचारी, 255 होमगार्ड तर 3 आर. सी. प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.