अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस दलातील 13 बहाद्दर पोलीस अधिकार्यांना उल्लेखनीय, प्रशंसनीय, आणि खडतर कामगिरी पार पाडल्याबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व आंतरिक सुरक्षा पदक प्रदान करण्यात येणार आहे. यात 8 पोलीस अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचार्यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज गौरविण्यात येईल.
आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित सोहळ्यात केंद्र शासनाचे उत्कृष्ट तपास पदक मिळवणारे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर. आंतरिक सुरक्षा पदक विजेते पोलीस अधिकारी- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस महासंचालक सन्मान चिन्हप्राप्त अधिकारी व कर्मचारी – सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, दिवंगत सहायक फौजदार दीपक लाड, पोलीस हवालदार मंगेश पाटील, पोलीस हवालदार राजेश नाईक, पोलीस हवालदार सुधीर मोरे, महिला पोलीस हवालदार सुषमा राऊळ यांना गौरवण्यात येईल.