उरण(विठ्ठल ममताबादे ) : १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू युवा केंद्र, अलिबाग यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरिय सर्व वयोगटासाठी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वनवणवा थांबवा- वन व वन्यजीव वाचवा ह्या एका विषयावर मराठी निंबध लेखन स्पर्धेचे तिसऱ्यांदा आयोजन होत असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.
१२ जानेवारी २०२३ पासुन १७ जानेवारी २०२३ पर्यंत स्पर्धकांनी आपले निंबध ९८७०९५५५०५ ह्या व्हाटस्अप क्रमांकावर लेखी स्वरुपात अथवा टायपिंगद्वारे पीडीफ फाईल स्वरुपात पाठविण्याचे सर्व स्पर्धकांना आवाहन आयोजकांनी केले आहे.
निबंधाची शब्द मर्यादा १२०० ते १५०० शब्दापर्यंत आहे. ही स्पर्धा नि:शुल्क आहेच शिवाय प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे दोन हजार रुपये, दिड हजार रुपये, एक हजार रुपये रोख रक्कमे सोबत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र म्हणून पारितोषिके मिळाणार आहेत, शिवाय पाच उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग ई प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात येणार असल्याचे मत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ह्या स्पर्धेसाठी परिक्षकांची निवड झाली असून २४ जानेवारी रोजी स्पर्धेचे विजेते घोषित केले जातील तरी जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी ह्या निबंध स्पर्धेत सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे मत नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांनी मांडून निंबध स्पर्धा जाहीर केली आहे.