नागोठणे (महेंद्र माने) : रोहा तालुक्यातील पिगोंडे ग्रुपग्रामपंचायत येथे रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी सरपंच संतोष कोळी, उपसरपंच कांचन माळी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हात्रे, जिल्हाउपाध्यक्ष गोविंद म्हात्रे, सचिव रमेश तांडेल, ग्रा.पं.सदस्य – सखाराम घासे, धनाजी पारंगे, ग्रा.पं.सदस्या कुसुम बावकर यांच्यासह ग्रामसेवक विजय अहिरे, संघटनेचे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव-सदस्य तसेच जिल्ह्यातील ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सभेची सुरूवात सरपंच संतोष कोळी व संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हात्रे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा सचिव रमेश तांडेल यांनी परिपत्रक वाचन केले. जिल्हाध्यक्ष मंगेश म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषदमध्ये 10 टक्के नोकर भरती होणार आहे.
सदरील भरती ही जेष्ठता यादी प्रमाणे करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व कर्मचार्यांच्या पाठी संघटना उभी असल्याचे शेवटी सांगितले. यानंतर सभेत विविध विषयांवर साधकबाधक चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांच्या चहा-नास्टा तसेच जेवणाची व्यवस्था सरपंच संतोष कोळी यांनी केली.
सभेचे आयोजन व प्रस्तावना रा.जि.कार्यकारणी सदस्य हेमंत जाधव यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजक विनोद घासे,विजय मांडलुस्कर,संजय पारंगे,लीलाधार माळी,उत्तम जाधव,प्रदीप बडे,दिनेश बावकर,नंदू बावकर,शिवरामपारंगे,जगदीश चौलकर, महादेव घासे तसेच रोहा तालुक्यातील संघटनेच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.