भाकरवड (जीवन पाटील) : अलिबाग तालुक्यातील रा. जि. प. शाळा पोयनाड येथे दि 9 डिसेंबर 2022 रोजी STARS प्रकल्पाअंतर्गत BRC/ CRC सक्षमीकरण PLC Professional Learning Community अर्थात व्यावसायिक अध्ययन समूह. PLC बैठक गटशिक्षणाधिकारी सन्मा.श्री.पिंगळा साहेब , जिल्हा समन्वयक श्री. वीसे सर, तालुका संघटना अध्यक्ष श्री.भोपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
तालुका समन्वयक तथा सुलभक श्री. विश्वजित म्हात्रे सर यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थित सहभागी सदस्यांना प्रशिक्षित केले. ICE BREAKING ,सदस्यांची अभिव्यक्ती, कर्तव्य व जाबाबदारी, नियोजन, सनियंत्रण, व्यवस्थापन व लेखन कौशल्य यावर भर देत सुंदर चर्चा घडवून आणली.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात उपस्थित मान्यवरांना श्री.वि.का. पाटील केंद्रप्रमुख पेझारी यांनी पुष्पहार देऊन यथोचित स्वागत करून केले .एकूण 43 शिक्षणार्थी या बैठकीला उपस्थित होते. विषय साधन व्यक्ती विशेष शिक्षक केंद्रप्रमुख ,शिक्षक वृंद सर्वांचा सक्रिय सहभाग लाभला गटचर्चा व सादरीकरण आणि शेवटी मला काय मिळाले ?आणि मिष्कील अशा श्री. निलेश वारगे यांच्या आभार प्रदर्शनाने अत्यंत आनंदी व मोकळ्या वातावरणात पहिली PLC बैठक पोयनाड प्राथमिक शाळेत संपन्न झाली.