‘रिया चक्रवर्तीने’ ८ वर्षात ७ चित्रपट केले ते ही फ्लॉप, मग एवढी माया आली कुठून

मुंबई : सर्वच स्तरावर चर्चेत असलेला विषय म्हणजे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या. त्याच प्रकरणाशी जोडलेले नाव म्हणजे रिया चक्रवर्ती.  एकेकाळी ती सुशांतची गर्लफ्रेन्ड होती सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात तिच्या विरोधात एफआयआर दाखल केले. सांगायचे तर रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये मोजके चित्रपट केलेत.ते हे फ्लॉप, तरीही तिच्याकडे कोट्यावधी रूपयांची माया आली कुठून.

रियाचे वडील आर्मीत डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी. तिला एक भाऊ असून त्याचे नाव शेविक आहे. या चौघांवरही सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा आरोप आहे.

एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती पहिली रनर अप होती. व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टिकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केलेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंग करिअर खुणावू लागले.

व्हीजे असताना रिया इंजिनिअरिंग करत होती. मात्र अ‍ॅक्टिंग करिअरसाठी तिने इंजिनिअरिंग सोडले. 2012 मध्ये तिला पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म ‘तुनीगा तुनीगा’तून पदार्पण केले. त्यानंतर 2013 मध्ये  ‘मेरे डॅड की मारुती’,2014 मध्ये ‘सोनाली केबल’ ’ यानंतर सलग 3 वर्षे रियाला कुठलेही काम नव्हते. 2017 मध्ये तिला ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ आणि ‘दोबारा- सी योर इव्हिल’ ‘बँकचोर,2018 मध्ये ‘जलेबी’ या सिनेमात रियाची लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून वर्णी लागली. पण हे ही   चित्रपट फ्लॉप झाले.

गेल्या 8 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांचे रियाचे इन्कम टॅक्स रिटर्न बघितले असता तिचे वार्षिक उत्पन्न 10 ते 14 लाखांच्या आसपास आहे.  तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे.  मुंबईत तिचे दोन फ्लॅट आहेत.सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रियाकडे असलेल्या संपत्तीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रियावर सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटीही फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.