मुंबई : देशभरात गाजत असलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता ईडी (अंमलबजावणी संचालनालय )ची एंट्री झाली आहे. यामुळे रियासह भल्याभल्यांना घाम फुटण्याची शक्यता आहे. ईडीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिला लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवले जाऊ शकते.
सुशांत आत्महत्या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी बिहार पोलिसांचे पथक गेल्या तीन दिवसापासून मुंबईत आहे. बिहार पोलीस सुशांतच्या बँक खात्याचा तपशील गोळा करत आहे. या घडामोडी होत असतानाच ईडीने रिया विरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या बँक खात्यातून पैसे वाढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यामुळे मुंबई पोलिसांबद्दल गैरसमज पसरू लागला आहे.
बॉलीवुड सुपर स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सुसाईड केसमध्ये बॉलीवुडच्या दिग्गजांची चौकशी पोलीस करत आहेत. सुशांतच्या फॅन्सचे म्हणणे आहे की, त्याला सुसाईड करण्यास भाग पाडले होते. याचे प्रमुख कारण इंडस्ट्रीमधील भाई-भतीजावाद आहे. याशिवाय, बॉलीवुडमध्ये प्रत्येकजण त्याच्यावर बहिष्कार टाकत होता. लोकांचे म्हणणे आहे की, जर बॉलीवुडमध्ये कुणी प्रभावशाली व्यक्ती कुणाचा बहिष्कार करत असेल, तर कुणीही त्या व्यक्तीशी बोलत नाही. त्याला एकटा पाडतात.
सुशांतच्या फॅन्सने त्याचे एक जुने ट्विट शोधून काढले आहे. जे सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे. या ट्विटमध्ये तो स्वत: स्वीकार करत आहे की, त्याला बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले जात नाही. हे ट्विट 2016 चे आहे. ज्यामध्ये एक फॅन सुशांतला सतत बॉलीवुड पार्टी अॅटेंड करण्याची रिक्वेस्ट करत होता. जी एका विशेष रात्री होत होती. सुशांत नेहमी आपल्या फॅन्सला उत्तर देत असे. त्यांच्यासोबत नेहमी चर्चा करत असे. त्या दिवशीसुद्धा त्याने पार्टीत का जात नाही ते सांगितले.