नागोठणे (महेंद्र माने) :: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे मण्युफकचरींग डीव्हिजन सी. एस. आर. विभाग व लायन्स हेल्थ फाउंडेशन,अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत कुहिरे व वरवठणे येथील 45 वर्षावरील नागरीकांसाठी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरात रिलायन्स जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी रिलायन्स कंपनी नागोठणे विभागातील नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
कुहिरे ग्रामपंचायत येथील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन रिलायन्स इंडस्ट्रीजचे आय. आर. विभाग प्रमुख श्रीकांत गोडबोले, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे व सी.एस.आर. अधिकारी वरदा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कुहीरे सरपंच प्रज्ञा जवके, नागोठणे पोलीस निरीक्षक राजन जगताप, रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉ. उपाध्यक्ष उदय जवके तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन, अलिबाग मुख्यकार्यकारी अधिकारी शुभदा कुडतरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पो.नि.राजन जगताप यांनी रिलायन्स कंपनी करीत असलेले सामाजिक कार्य खूप चांगले व मोलाचे असून त्याचा समाजाला नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक फौजदार दयानंद ठाकूर,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वरवठणे ग्रामपंचायत येथील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीकांत गोडबोले,रमेश धनावडे, वरदा कुलकर्णी व शुभदा कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच ऋतुजा म्हात्रे,उपसरपंच विजय पाटील,ग्रा.पं.सदस्य गणपत म्हात्रे,हरिश्चंद्र म्हात्रे,रिलायन्स वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बारडोलइ व त्यांचे सहकारी डॉ.किरण सातवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी रमेश धनावडे यांनी येथील रिलायन्स कंपनी विभागातील नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.यावेळी श्रीकांत गोडबोले, डॉ. प्रशांत बारडोलइ व गणपत म्हात्रे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरदा कुलकर्णी यांनी केले.
तसेच या नेत्र शिबिरात कुहीरे येथे 71 रुग्ण तपासणी करून एकुण 26 रूग्णांना मोतीबिंदू निदान करण्यात आले.तर वरवठणे येथे 47 रुग्ण तपासणी करून एकुण 14 रूग्णांना मोतीबिंदू निदान करण्यात आले असून मोतीबिंदू रुग्णांचे अलिबाग येथे शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याची माहिती वरदा कुलकर्णी यांनी दिली.