पनवेल (संजय कदम) : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील हे गेल्या काही वर्षे हॉस्पिटल मधले अव्वाच्यासव्वा लावलेलीं बिले कमी करणे, रुग्णांना तातडीच्या सेवा पुरविण्यासाठी हॉस्पिटलला संपर्क करणे, अशा अनेक कर्तव्ये रुग्णसेवा म्हणून पार पाडत आहेत. अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना रोज दिवशी सेवा म्हणून रुपेश पाटील आणि त्यांची टीम कार्य करत आहेत.
गेल्या २ महिन्यात ह्याच माध्यमातून प्रतिष्ठित हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांना वठणीवर आणून अवाच्यासव्वा लावलेल्या बिले कमी करून घेतले व हि रक्कम सुमारे १५ ते १६ लाख रुपये वाचविले आहेत ! ह्याच धर्तीवर जिल्ह्याच्या रुग्णांची सेवा घडावी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून लोकांना मदत मिळावी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या सूचनेने, आणि वैद्यकीय कक्षाचे प्रमुख श्री मंगेश जी चिवटे यांच्या तर्फे रुपेश पाटील यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या रायगड जिल्हा कक्ष प्रमुख म्हणून तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब फॉउंडेशन च्या जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे !