कर्जत (गणेश पवार) : पनवेल – कर्जत या रेल्वे मार्गावर दुसऱ्या रेल्वे लाईन मार्गाचे काम सुरू असताना,कर्जत – चौक तथा मुंबई – पुणे या महमार्गावर जोड रस्ता असलेल्या मौजे वडविहार गावाचा जोड रस्ता असलेल्या विरूद्ध दिशेला सदर रेल्वे लाईन मार्गाच्या कामा दरम्यान रेल्वे कडून अधिकृत नेमणूक करण्यात आलेल्या ठेकेदारांनी बेजबादार पध्दतीने केलेल्या ब्लास्टिंगमुळे आईसह मुलाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी तर कर्जत – चौक तथा मुंबई – पुणे या महमार्गावर जोड रस्त्याव व्यावसाय करून आपल्या कुंटूबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना फटका बसला आहे. तर या बेजबाबदार ब्लास्टिंगमुळे कर्जत किरवली येथील देवकाबाई महादू बडेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची तर त्यांचा मुलगा सचिन महादू बडेकर यांचा कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच या घटने मध्ये चंद्रकांत मर्या मोकळं वय वर्ष ६५ जखमी पायला दुखापत व वंदना चंद्रकांत मोकळ वय वर्ष ६० हे जखमी झाल्याचे तर पुणे जिल्हयातील इंदापूर – बारामती येथील विकास भारत भोसले वय वर्ष २३ यांस पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले असल्याची तसेच काही लोक जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर या घटने मध्ये एका डंपरच्या डिझेल टाकीवर मोठा दगड आदळल्यामुळे सदर डंपरनी पेट घेतल्याने डंपरला मोठया प्रमाणात आग लागली असुन, या मध्ये डंपरचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, कर्जत तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, खालापूरचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार व सुर्यवंशी यांच्यासह पोलीस टीम हजर झाली. या घटनेच्या विरोधात नागरिकांनी मोठया प्रमाणात रास्ता रोको केल्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली असुन, सदर परस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीसांना यश आले आहे. परंतू सदर बेजबाबदार व लोकांचे जिवितास कारणीभूत असलेल्या रेल्वे ठेकेदारा विरोधात पोलीस व रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार या कडे मात्र लोकांचे लक्ष लागले असुन, सदर रेल्वे ठेकेदाराच्या बेजबादार पणामुळे निरअपराध असलेल्या माय लेकाला आपला जिव गमवावा लागला असल्याने मात्र कर्जत खालापूर तालुक्यात हलहल व्यक्त होत आहे. तर या घटनेमुळे बेजबाबदार ठेकेदारा विरोधात मणुष्यवधाच्या गुन्ह्यानुसार कारवाईची मागणी ही लोकांन कडून केली जात आहे.