रोहा : गणेशात्वासाठी कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांचा गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. यासाठी रायगडातील रोहा आगाराने विषेश एसटी गाड्यांची सोय केली आहे. मुंबई, बोरीवली, नालासोपारा व ठाणे या मार्गावर शुक्रवार 28 ऑगस्ट ते रविवारी 30 ऑगस्ट या कालावधीत या बसेस धावतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे यांनी दिली. या एसटी प्रवासाकरिता ई-पासची आवश्यकता राहणार नाही.
रोहा आगारातून रोहा ते बोरीवली बस सकाळी 10 व दुपारी 2 वाजता सोडण्यात येईल. रोहा ते मुंबई दुपारी 1 वाजता, रोहा ते ठाणे सकाळी 9 वाजता, तळा ते नालासोपारा सकाळी 8 व दुपारी 2 वाजता, तळा ते मुंबई दुपारी 1 वाजता, तळा-इंदापूर-बोरीवली दुपारी 12 वाजता, तळा-रोहा-बोरीवली 3 वाजता, कोलाड ते मुंबई दुपारी 2.30 वाजता, कोलाड ते बोरीवली बस दुपारी 2.30 वाजता रोह्यातून सुटेल.
हे कोरोना नियम बंधनकारक
1 एका बसमध्ये फक्त 22 प्रवासी असतील.
2 ग्रुप बुकिंगकरिता 22 प्रवासी आवश्यक असतील.
3 प्रवासात सर्व प्रवाशांना कोरोनाविषयक नियमांचे पालन बंधनकारक.
4 प्रवाशांनी सोबत सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक.
5 खाण्या-पिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे