कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील मौजे देवकान्हे येथे देवकान्हे,बाहे आणि धानकान्हे या गावांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी देवकान्हे माती बंदर येथे रविवारी 8 जानेवारी रोजी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते. या स्पर्ध्येत माणगाव येथील गाडी मालक वासुदेव गुगले यांची बैलगाडी प्रथम तर सेमी फायनलमध्ये यशवंत थिटे बाहे रोहा यांची बैल गाडी प्रथम आली असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले.
उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या रोहा तालुक्यातील देवकान्हे बाहे आणि धानकान्हे येथील ग्रामस्थ व हौशी बैलगाडी मालक यांच्या संयुक्त विद्यमनाने या जंगी बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्ध्येत जववळपास चाळीस ते पन्नास बैलगाडी हौशी यांनी सहभाग नोंदवला होता तर सदरच्या आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीला फायनल गटातून प्रथम वासुदेव गुगले ,द्वितीय प्रथमेश शेळके, तृतीय राम शेडगे तर सेमिफायनल मध्ये प्रथम यशवंत थिटे, द्वितीय सागर, तृतीय किशोर सावंत, योगेश देशमुख ,यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकली आहे.
तसेच स्पर्ध्येत गटातून सोडण्यात आलेल्या बिना काठी व एक हकळणारा ड्रायव्हर बैलगाडी शर्यत मध्ये गट क्रमांक एक मधून राहुल बामुगडे प्रथम,चंद्रकांत लहाने द्वितीय,साहिल साबळे तृतीय,गट क्रमांक दोन मधून राजू वागलेप्रथम ,अनिकेत भोसले द्वितीय,अनिल वाटावे तृतीय,गट क्रमांक तीन मधून महेश मगर प्रथम,सुनील खेडकर द्वितीय ,तुषार देशमुख तृतीय,गट क्रमांक चार मधून नामदेव देवकर प्रथम ,संतोष गायकर द्वितीय,निलेश पोकळे तृतीय,यांच्या बैलगाड्यानी शर्यत जिंकली त्याच बरोबर अतिशय रंगदार आणि मजेदार शर्यतीचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला तो म्हणजे कॉटर फायनलमध्ये या गटात सुहास कडव प्रथम,सन्नी जाधव द्वितीय ,तर रितेश भोईर तृतीय ,यांच्या बैलगाडीने कमालीची शर्यत जिंकली.
गावदेवी देवकान्हे माती बंदरावर प्रथमच येथील ग्रामस्थ व बैलगाडी हौशी नागरिकांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते याला हौशी रसिकप्रेशकांनी भरभरून प्रतिसाद देत याचा आनंद लुटला तर यांचा शुभारंभ रोहा पं सं चे माजी उपसभापती बाळकृष्ण बामणे,देवकान्हे ग्राम पंचायत चे विद्यमान उपसरपंच सूरज कचरे,रोहा तालुका कुणबी युवक संघटनेचे व ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष अनंत थिटे,बाबुराव बामणे,गजानन बामणे,ग्राम पंचायत सदय दयाराम भोईर,रविंद्र राऊत,भरत कान्हेकर ,खांब विभागीय ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष डॉ श्यामभाऊ लोखंडे,शांताराम लोखंडे,देवकान्हे पोलीस पाटील दया भोईर,सुनील थिटे संतोष भोईर,विश्वनाथ जाधव,तानाजी भोईर,किसन सुटे,गजानन भोईर,दत्ता भोईर,संघटनेचे अध्यक्ष गोवर्धने ,गोरख नाईक ,यशवंत थिटे,महेंद्र थिटे,राम शेडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या स्पर्ध्येचे शुभारंभ करण्यात आले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावदेवी देवकान्हे मंडळांनी अथक परिश्रम घेतले.