रोहा : देवकान्हे येथे 8 जानेवारी रोजी बैलगाडीच्या जंगी शर्यतीचे आयोजन

bail-gada
कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील मौजे देवकान्हे येथे देवकान्हे, बाहे,आणि धानकान्हे या गावांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी देवकान्हे माती बंदर येथे रविवारी 8 जानेवारी रोजी सकाळी ठीक 7 वाजता रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाला योग्य पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गावदेवी देवकान्हे माती बंदर च्या मैदानावर रविवारी 8 जानेवारी रोजी ठीक सकाळी 7 वाजता या बैलगाडी जंगी शर्यतींचे आयोजन येथील देवकान्हे,बाहे,आणि धानकान्हे या गावांतील बैलगाडी हौशी मंडळीने केला आहे. त्यामुळे आयोजित केलेल्या या भव्य दिव्य स्पर्ध्येत जिल्ह्यातील असंख्ये बैलगाडी (छकडा ) स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे ही 6 जानेवारी पर्यंत सिद्धेश शेडगे 7066830478 ,महेंद्र थिटे 9209647042,संदेश भोईर 8180854628,राकेश सुटे 7875410799,आकाश जाधव 7030181205,प्रशांत गायकवाड 7350677734,अशोक देवकर 8263908874,अंकेश सुटे 8010604512,वरील क्रमांकावर संपर्क साधून नावे नोंदणी करावी असे आवाहन आयोजक गावदेवी देवकान्हे यांच्या कडून करण्यात येत आहे.
तसेच स्पर्ध्येच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे पंचांचा निर्णय अंतिम राहील,ज्या गटात बैलगाडी ठेवण्यात आली आहे त्याच गटात ती गाडी सोडण्यात येईल तसेच जर गाडी कोणत्याही कारणास्तव सुटली तर ती गाडी पुढील गटात सोडण्यात येणार नाही ही स्पर्धकांनी नोंद घ्यावी,कोणताही प्रकारचा वाद निर्माण केल्यास ती गाडी बाद केली जाईल.तसेच शुल्लक कारणावरून वाद घालू नये.वाद घातल्यास पुढील तीन शर्यतीत बंदरात प्रवेश दिला जाणार नाही, प्रत्येक गट हा 05 मिनिटांनी सोडला जाईल कारण लाईनवर लावून गाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच गाडी चालकांनी वरील नियमांचे पालन केले नाही तर ती गाडी स्पर्धेतून बाद केली जाईल गाडी स्पर्धकांची नावे ही 6 जानेवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नोंदवली जाणार आहेत तद्नंतर नोंद नावे घेतली जाणार नाहीत,स्पर्धेतील गाडी ही बिना काठी व एक हालकणारा ड्रायव्हर असणार आहे यांची प्रथम येणाऱ्या सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
तरी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गावदेवी देवकान्हे माती बंदर येथे देवकान्हे , बाहे , धानकान्हे येथील गाडी हाकळणारे हौशी ग्रामस्थ अधिक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *