रोहा ,धाटाव,किल्ला अशोक नगर,येथे आज विश्वकर्मा जयंती

कोलाड (श्याम लोखंडे) : पृथ्वी ,जल व सर्व प्राणी मात्रांचा निर्माता आजवर उत्कृष्ट शिल्पी व वास्तूरचनेचा निर्माता म्हणून भगवान विश्वकर्माचा संस्कृत पोती पुराणात व महाभारतात उल्लेख देखील आहे लोहार, सोनार, कुंभार, सुतार,इत्यादींना विश्वकर्माचे वंशज मानले जातात या अनुषंगाने 17 सप्टें  हा दिवस देशात तसेच विविध राज्यात मेस्त्री कारागीर तसेच विविध कलाकृती करणारे व हात मजूर यांच्या वतीने प्रख्यात शिल्पी भगवान विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून मोठया आनंदाने साजरा करतात याचे औचित्त साधून रोहा तालुक्यातील रोहा, दमखाडी,धाटाव,तसेच मौजे किल्ला अशोक नगर येथे सुदीप कन्स्ट्रॅकशन यांचे मालक परेश देवनाथ या परिवाराच्या वतीने गेली चौविस वर्ष हा उत्सव सुदीप कन्स्ट्रक्शन व त्यांचे सर्व कारागीर मजूर कामगार वर्ग यांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने साजरा करतात,

या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ठीक 9 वा कलश पूजन  विश्वकर्मा  मूर्तीची स्थापना व आदिस्थानाची महत्वपूर्ण महापूजा  केली जाते तसेच या कारागीरांचे काम करण्याचे साधन तसेच साहित्य पूजन देखीळ याक्षणी करण्यात येते यावेळी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवर उद्योजक तसेच विविध कारागीर कर्मचारी वर्ग या  कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शीवतात तसेच देवनाथ परिवाराला यानिमित्ताने शुभेच्छा देतात.

परेश देवनाथ यांच्या परिवाराच्या वतीने सालाहबाद प्रमाणे दरवर्षी प्रमाणे 17 सप्टें व 18 सप्टें रोजी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते किल्ला धाटाव दमखाडी सह रोहा शहरात तसेच विविध ठिकाणी हि जयंती मोट्या उत्साह वातावरणात साजरी केली जाते, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश , आंध्र प्रदेश, गुजरात, कलकत्ता, येथील कलाकुसर करणारा तांत्रिक कामगार (मिस्त्री) काम करणारे वर्ग विश्वकर्मा पूजा करतात , अभियांत्रिकी स्थापत्यशास्त्र यामधील अभियंते कामगार वर्कशॉप कारागीर यांच्या मध्ये या दैवताचे महत्वाचे स्थान मोठ्या श्रद्धेने पूजा करतात .

या दिवशी भगवान विश्वकर्मा यांचे मूर्तीची स्थापना पाद्य पूजन महाआरती भजन महाप्रसाद व समारोपाला मूर्तीची मिरवणूकिच्या माध्यमातून भावपूर्ण निरोप मिर्तीचे नदीपात्रात विसर्जन करून हा उत्सव आनंदाने साजरा करतात.

परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सावधगिरी बाळगून व प्रशासकीय यंत्रणेचा पालन करून हा उस्तव पार पाडण्यासाठी स्वतः परेश देवनाथ आणि परिवार तसेच त्यांचे सहकारी अथक परिश्रम घेत आहेत,