रोहा प्रेस क्लबच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 132 दात्यांनी केले रक्तदान

roha-press-club
कोलाड : रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 132 पिशव्या रक्त जमा करण्यात आले. कै जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचवले होते. ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने तसेच सामाजिक बांधिलकी जपत गेली 20 वर्षं रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.
गेली अनेक वर्षे अविरतपणे राबवित असलेला उपक्रम व या शिबिराच्या प्रारंभी कै जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरूण करंबे, दिलीप वडके, राजेंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, महेश सरदार, अहमद दर्जी, दिलीप वडके, विजय देसाई, विलास कुलकर्णी, शरद पवार, उस्मानभाई रोहेकर, राजेश काफरे, शैलेश रावकर आदिं मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक, रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी एस टी महामंडळ व्यवस्थापन व कर्मचारी यांनी सदिच्छा भेट दिली.
शिबिरासाठी रायगड प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजनकर , उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत मोरे, परिषद प्रतिनिधी पराग फुकणे, नंदकुमार मरवडे, अल्ताफ चोरडेकर, सुहास खरीवले, नरेश कुशवाह, श्याम लोखंडे, रविंद्र कान्हेकर, सागर जैन, शरद जाधव, समीधा अष्टीवकर, सचिन शेडगे, विश्वजित लुमण, दिनेश जाधव, रविना मालुसरे, अंजुम शेटे, सिद्देश ममाले, सचिन साळुंखे, उद्धव आव्हाड, नंदकुमार बामुगडे ,सौ दीपाली जाधव,आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढीचे डाॅ दीपक गोसावी व त्यांच्या टीमने सहकार्य केले.
दरम्यान गेल्या तीन महिन्यात रोहयात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काही ब्लड कॅम्प झालेले आहेत. असे असतानाही या शिबिरास रक्त दात्यांनी मोठ्या प्रमाणात व उत्साहात प्रतिसाद दिले. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी रक्तदात्यांचे, सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *