नागोठणे (महेश पवार) : सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे रोह्यात लेहराओ तिरंगा प्यारा या संकल्पनेतून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी दहा नंतर राष्ट्रध्वज संचलन खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले, यासाठी एक किलोमीटर लांब व ९ फूट रुंद राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या रेकॉर्ड ब्रेक प्रजासत्ताक दिनाचे पाईक होण्यासाठी रोहेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, रोहा येथील नवरत्न हॉटेल ते फिरोज टॉकीज पर्यंत रस्ता गर्दीने फुलून गेला होता. शहराच्या या दोन्ही टोका पर्यंत राष्ट्रध्वज नागरीक घेउन जात होते. अभूतपूर्व असं वातावरण निर्माण झाले होते.
खासदार सुनिल तटकरे यांच्यासह आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने तहसीलदार कविता जाधव – माने या सर्वांनी भारतात शांतता प्रस्थापित होण्यासाठी आकाशात शांततेचे प्रतीक असलेले कबुतर उडवले. या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, युवक-युवती, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदाय, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, स्वच्छ्ता आरोग्य सभापती महेंद्र दिवेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव – माने , रोहा पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांसह अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.