रोहिदास घोडेकर, धीरज तलरेजा, नवीन चंद्रा, राजू पिचिका व सहकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

aditi

अलिबाग : रिलायन्स उद्योग समूहाच्या उद्यान विभागाचे प्रमुख श्री.रोहिदास घोडेकर यांनी रिलायन्स कंपनीच्या सौजन्याने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराचे सुशोभिकरण केले. त्यामध्ये बायोॲस्टूटिक लँड स्केपिंग केले असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तुषार व ठिबक सिंचनाचीही सोय केली आहे. तसेच सुशोभिकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुमारे एक हजार पाचशे विविध फुलझाडे व शोभेची झाडे लावली आहेत. हे सर्व काम त्यांनी अत्यंत अल्प कालावधीत पूर्ण केले.

एके कमानी प्रा.लि.,खालापूर चे अध्यक्ष श्री.धीरज तलरेजा व एच.आर.सी.एच.आर.इंडियन ऑईल टेकिंग लि.उरण चे प्रमुख नवीन चंद्रा यांनी त्यांच्या कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिला.

तर राजू पिचिका यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले, मुख्य इमारतीच्या बाहेरील बाजूची रंगरंगोटी केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या इमारतीचे नूतनीकरणही केले आहे.

या सर्वांच्या अमूल्य सहकार्याबद्दल श्री.रोहिदास घोडेकर, श्री.धीरज तलरेजा, नवीन चंद्रा व त्यांच्या सहकाऱ्यांचा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विशेष सत्कार करण्यात आला