नागोठणे (महेश पवार) : नागोठण्याजवळील वरवठणे (ता. रोहा) गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुंदराबाई किसन म्हात्रे (वय ९२) यांचे बुधवारी (दि.१६) पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास वरवठणे येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, पाच विवाहित मुली, जावई, नातवंडे, पतवंडे व भाचे यांच्यासह मोठा परीवार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नागोठणे विभागातील नेते, रोहे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, वरवठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच नागोठणे विभाग बारा गाव आगरी समाजाचे अध्यक्ष गणपतशेठ म्हात्रे व आशोकशेठ म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होत. कै. सुंदराबाई किसन म्हात्रे यांचे पती कै. किसनखोत म्हात्रे यांनी जगाचा निरोप घेऊन ३१ वर्षे झाली. म्हणजेच त्यांचे निधन दि.१० सप्टेंबर रोजी झाले. तर स्व.सुंदराबाई किसन म्हात्रे ह्यांचे दि.१५ सप्टेंबर २०२० रोजी झाले. सुंदराबाई खूप कष्टाळू, सर्वांच्याा सुख-दुखःत धावून जाणाऱ्या कै. सुंदराबाई म्हात्रे आपल्या मधून निघून गेल्याचे समजताच वरवठणेसह नागोठणे विभागातील अनेकांना दुुःख अनावर झाले.
नागोठणेसह संपूर्ण परीसरातील तसेच रोहा तालुक्यातील अनेकांचे गणपतशेठ म्हात्रे व अशोकशेठ म्हात्रे यांच्याशी असलेले नाते संबध, मित्र मंडळी, सांप्रदायातील अनेक मंडळी व वरवठणे गावातील संपूर्ण तरुण वर्ग व संपूर्ण गाव कै. सुंदराबाई किसन म्हात्रे यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कै. सुंदराबाई किसन म्हात्रे यांचे दशक्रिया विधी समाजाच्या परंपरेनुसार शुक्रवार दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ८-३० वा.अंबा नदीवरच होणार आहेत. तसेच त्यांचे उत्तर कार्य सोमवार दि.२८ सप्टेेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी वरवठणे येथे राहत्या घरी होणार असल्याचे म्हात्रे कुुुुटूंबियांकडून साांगण्यात आले.