रोह्यातील “शिवसृष्टी” प्रकल्पाच्या भुमीपुजनाचे नागोठण्यातील शिवभक्तांना आमंत्रण

mahesh8

नागोठणे (महेश पवार) : रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे त्याच बरोबर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने तसेच रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहास साकारणाऱ्या “शिवसृष्टी” प्रकल्पाचे भूमिपूजन गुरूवार दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती ताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत “कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प रोहा” येथे संपन्न होणार आहे.

याच ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या संकल्पनेतुन नागोठणे शहर आणि विभागातील शिवप्रेमी, शिवभक्त यांना सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी रोहा तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांनी आज नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेट देत सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, पत्रकार बंधू यांना आमंत्रण देण्यात आले. यावेळी राष्ट्वादी काँग्रेसचे बाळासाहेब टके, विनय गोळे, सचिन कळसकर, संतोषभाई कोळी, अखलाक पानसरे, अतुल काळे, दिनेश घाग, अभिषेक वाळंज, मनोज टके, प्रणय डोके, चेतन टके, अक्षय नागोठणेकर, केतन भोय, अॅड. श्रिकांत रावकर, पत्रकार अॅड. महेश पवार, पत्रकार मंगेश पत्की, पत्रकार महेंद्र म्हात्रे, मंदार चितळे, पवन जगताप आदी मान्यवरांसह शिवभक्त नागरिक उपस्थित होते. त्याच बरोबर राष्ट्वादी काँग्रेसचे विभागीय नेते भाईसाहेब टके यांच्या निवासस्थानी जयवंतदादा मुंढे याांनी भेट देऊन निमंत्रण निमंत्रण पत्रिकेचे वाटप करत कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहण्यासाठी आग्रहाची विनंती केली.