रोह्यात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्त राज्य स्तरीय खो-खो स्पर्धेचं आयोजन

aniket-tatkare
कोलाड (श्याम लोखंडे ) : रायगड रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 82 वा वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूल धाटाव येथील नथुराम भाई पाटील प्रांगणात 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022 रोजी राज्य स्तरीय कुमार व मुली खो-खो स्पर्धा संपन्न होणार आहेत भव्य आणि दिव्य स्वरूपात खेळविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती रायगड जिल्हा खो-खो स्पर्धेचे अध्यक्ष युवा नेते तथा आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोहा तालुक्यात दुसऱ्यांदा ही स्पर्धा संपन्न होणार आहेत अशी पत्रकारांना माहिती देताना आ अनिकेत तटकरे यांच्या समवेत यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष खो-खो विजयराव मोरे , कोठेकर सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष प्रमिला ताई पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा महिला तालुका सेक्रेटरी स्नेहा ताडकर, आदी उपस्थित होते. पुढे माहिती देतांना म्हणाले की या स्पर्धेत राज्यभरातील 24 कुमार गट‌ व 24 मुली गट भाग घेतील प्रत्येक गटात 15 खेळाडू व अधिक त्यांचें मार्गदर्शक असे सुमारे 825 अधिक अन्य असे एकुण 1200 लोकांची रेल्वे स्थानकावरुन व एसटी स्टँडवरुन आणण्याची , राहण्या व चहा, नाश्ता , जेवणा आदीची सर्व व्यवस्था करणार आहोत.तसेच खेळासाठी खास या पटांगणात चार ग्राउंड करण्यात येणार आहेत 2000 पेक्षा अधिक प्रेक्षक बसतील इतकी सुसज्ज आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर स्पर्धे साठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यांनी अनुकूलता दर्शवली की आमंत्रण पत्रिके मार्फत सर्वांना कळवण्यात येईल सांगितले तसेच या स्पर्धेत कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये , जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये, तसेच , इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आमंत्रण दिले जाणार आहे तरी रोहेकरांसह रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रेमींनी राज्य भरातील खेळाडूचे खो खो खेळाचा आनंद जवळून पाहावयास मिळणार आहे त्यामुळे स्थानिक शाळांमध्ये व तालुका जिल्हा पातळीवरील खेळाडूला या खेळाडूंचा अनुभव घेता येईल आणि कबड्डी खेळाबरोबरच खो खो खेळाची ही उंची अधिक वाढणार आहे.
रोहा तालुक्यात अंतर राष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी, कुस्ती,बुद्धिबळ,कॅरम ,सह अनेक खेळ खेळले गेले त्याच बरोबर मैदानी खेळ म्हणून खो खो याही खेळाचा मनात दृष्टीकोन ठेऊन या खेळाचे आयोजन आणि सुंदर नियोजन करण्यात आले आहे असे शेवटी यावेळी सांगितले.
तसेच शेवटी खो-खो खेळाचे मास्टर कोठकर सर यांनी मागील काळात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमां विषयी उजाळ देत म्हणाले सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आज पर्यंत नेस्नल कबड्डी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, बाॅडी बिल्डर आदी स्पर्धांचे उत्तम प्रकारे आयोजन केले आहे त्याच प्रमाणे या स्पर्धेचे आयोजन पण उत्तम प्रकारे करतील असा विश्वास आहे कारण मी यांच्या प्रत्येक स्पर्धेत यांच्या सोबत काम केले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *