कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील पत्रकारांची समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लब व कै. जनार्दन मारूती शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 03 डिसें. रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 दरम्यान शासकिय विश्रामगॄह दमखाडी येथे सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोहेकरांनी या सामाजिक उपक्रमास नेहमीप्रमाणे आपले योगदान देऊन सहकार्य करावे असे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
रोहयातील एक दानशुर व्यक्तीमत्व आणि प्रेसफोटोग्राफर कै. जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. कै जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात रक्तदानाचे महत्व जाणुन सत्तरहुन अधिक वेळा रक्तदान करताना विशेषत: अत्यंत गरजेच्या वेळी रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविले होते. कै. शेडगे यांच्या मॄत्युपश्चात त्यांचा हा समाजिक जाणिवेचा वारसा चालू ठेवण्याच्या उद्देशाने व त्यांना श्रद्वांजली महणुन त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन दरवर्षी त्यांचे मित्र मंडळ व येथिल पत्रकारांची सामाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून गेली 20 वर्षे या शिबिराचे आयोजन केले जात आहे.
राज्य रक्तसंक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य आणि शासकिय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहयोगातुन संपन्न होत असलेल्या या रक्तदान शिबिरास गेली एकोणीस वर्षे रोहेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहीती रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली आहे.
या शिबिरात सर्व पक्षीय मान्यवर, शासकीय अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित राहणार असून रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्त दात्यास ओळखपत्र दिले जाईल. सदर शिबीर यशस्वी करणयासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.