पनवेल (संजय कदम) : राज्यभरात अनधिकृत पणे लक्झरी बसमध्ये मोटार सायकल टाकुन व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्टसेल नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडून परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांना या गोष्टीची माहिती दिली.
राज्यभरात लक्झरी बस चालकांनी अनधिकृतपणे बसमध्ये मोटार सायकल व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत असल्याची माहिती नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना मिळाली होती. यासंदर्भात त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन ह्या अनधिकृत वाहतूक थांबवण्याची सूचना केली होती.
पनवेल कळंबोली येथे लक्झरी बसमध्ये मोटार सायकल व इतर वस्तूंची अवैध्य वाहतूक करणाऱ्यांना संघटनेचे पदाधीकारी दिनेश गोसावी, देवेंद्र उपाध्याय, रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील, अंकीत पाटील व इतर पदाधीकारी यांनी रंगेहाथ पकडून परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांना पाचारण केले व कारवाई करण्यास भाग पाडले. तसेच अश्या प्रकारे अनधिकृत वाहतूक करून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्टसेल नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी केली आहे.