पेण (राजेश प्रधान) : लव्ह जिहाद, भूमी जिहाद व हलाल विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी पेण येथे हिंदू जनजागृती सभेत केले.
आजकाल आपल्याला ‘हलाल जिहाद’ च्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. ‘हलाल’ आता केवळ मांसापुरती मर्यादित राहिले नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी अनेक उत्पादनेही ‘हलाल’ प्रमाणित असावीत, या दृष्टीने हिंदू व्यापार्यांना सक्ती केली जाते. देशभरात त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये गोळा केले जातात.
भारत शासनाच्या FSSAI आणि FDI या अधिकृत संस्थांकडून प्रमाणपत्र घेतलेले असतांनाही खाजगी मुसलमान संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. रायगड जिल्ह्यात हलाल सक्ती विरोधी कृती समितीची 5 ठिकाणी स्थापना झाली आहे.
‘वक्फ बोर्ड’ मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी आहे, असे भासवून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, जमीन, मंदिरेच नव्हे तर सरकारी जमीन देखील ‘वक्फ बोर्ड’ हडप करित आहे. हा काळा कायदा संपवण्यासाठी हिंदूंनी एक होऊन आवाज उठवला पाहिजे. ‘हलाल जिहाद’ आणि ‘वक्फ बोर्ड’चा ‘भूमी जिहाद’ च्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी केले.
यावेळी मुस्लिम व ख्रिश्चन देशांप्रमाणे हिंदू राष्ट्राची मागणीही एक मुखाने झाली पाहिजे असे प्रतिपादन प्रसाद वडके यांनी केले. मदरसे व कॉन्व्हेंट शाळांप्रमाणे धार्मिक शिक्षण देणाऱ्या वेदपाठशाळांना शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी धनश्री केळशीकर यांनी केली. यावेळी हिंदूराष्ट्र स्थापनेची शपथ शेकडो उपस्थितांनी घेतली.
या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गगुरू सुश्री अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू. सौ. संगीता जाधव, मनीष माळी, प्रवीण गाडगीळ, अमित पाध्ये आदींसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील विविध मान्यवरांसह शेकडो धर्मप्रेमी उपस्थित होते.