लाकडापासून शोभेच्या वस्तू बनवीण्याचा छंद बनला उदरनिर्वाहाचं साधन

uran-ram
उरण/चिरनेर (सुभाष कडू) : प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी  एक छंद असतोच, आपल्या आवडी प्रमाणे छंद जोपासला जातो .कुणाला गाणी गाण्याचा छंद असतो तर कुणाला रांगोळी काढण्याच, तर कुणाला पेंटिंग चा छंद तर कुणाला सायकलवरून प्रवास करायचा तर कुणाला गिर्यारोहणाचा तर कुणाला खाण्याचा असे विविध छंद आवडीनुसार जोपासत असतात, परंतु राम आत्माराम पांचाळ या अवलियाने गरिबी वर मात करून छंदातून आपल्या कुटुंबाच्या  उदरनिर्वाहासाठी लाकडातून विविध आकर्षक मूर्ती  कोरीवकाम करून आकर्षक मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला आहे .लाकडापासून विविध शोभेच्या वस्तू ,बनवून  त्या विक्रीतून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याची जवाबदारी  पेलली आहे .
उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हद्दीतील मोरा फड न.५ मध्ये राहणारे राम आत्माराम पांचाळ  यांची घरची परीस्थिती अत्यंत गरिबीची गरीबीवर मात करून त्यांनी  लाकडातून विविध मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे .
आज पर्यंत  त्यांनी लाकडातून धावता घोडा, छत्रपती शिवाजी महाराज, मच्छिमारी नौका, गरुड, हरण, सात घोडे,आदि मूर्ती बनविल्या आहेत. या मध्ये मच्छिमारी नौके च्या कलाकृतीला विशेष मागणी असते. त्यांची कलाकुसर पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. हा छंद त्यांचा व्यवसाय झाला असून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांच्या  परिवारचे ते उदरनिर्वाह करू शकलो. या कामात त्यांना त्यांची  पत्नी सौ .सारिका पांचाळ, मुलगा मयूर पांचाळ  यांची नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी संगितले.
…………………………………………………………………
 मी लहान असतांना  माझे वडील  दगडातून मूर्ती घडवीत असत. त्यांच्या  कडून मी  प्रेरणा घेतली व या प्रेरणेने घडलो . मला चित्रकलेची लहान पासूनच आवड असल्याने मी लाकडापासून मूर्ती बनविण्याचा छंद जोपासला त्यामुळे मी अनेक मूर्ती बनवून त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून  माझ्या कुटुंबियाचे उदरनिर्वाह करीत आहे.
— कलाकार राम पांचाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *