नागोठणे (महेंद्र माने) : लायन्स क्लबच्या माध्यमातून राजिप प्राथमिक शाळेतील (कचेरी शाळा) विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रोहा येथील व शाळेस गॅस शेगडी भेट देण्यात आली.
काही दिवसापूर्वी क्लबकडून विद्यार्थ्यांना झोन चेअरमन नुरुद्दीन रोहावाला यांच्या उपस्थितीत सहभोजन देण्यात आले. त्यावेळी रोहावाला यांनी शाळेला गॅस शेगडी भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता नुकतीच क्लबचे अध्यक्ष डॉ.अनिल गीते,सेक्रेटरी विवेक सुभेकर,चार्टड प्रेसिडंट प्रकाश जैन,डिस्ट्रिक्ट चेअरमन यशवंत चित्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊ व मुख्याध्यापिका संगिता सैंदाणे,शिक्षिका स्वाती पाटील यांच्याकडे गॅस शेगडी सुपूर्त करण्यात आली.
यावेळी डॉ. अनिल गिते यांनी क्लबच्या कार्याची ओळख देऊन सदरील कार्यक्रम नुरुद्दीन रोहावाला यांच्या माध्यमातुन होत असल्याचे सांगितले. यावेळी यशवंत चित्रे यांनी मुलांना स्टेजवर बोलायला लाऊन त्यांची बौद्धीक तपासणी केली. व मुलांचे तसेच शाळेतील शिक्षीका मुलांवर खुप मेहनत घेत असल्यामुळे त्यांचेही कौतुक करून आभार मानले॰यावेळी क्लबचे संतोष शहासने,सुधाकर जवके,सिद्धेश काळे,दिपक लोणारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.