नागोठणे (महेंद्र माने) : लायन्स क्लबच्या माध्यमातून शुक्रवार 2 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर क्लबचे अध्यक्ष डॉ.अनिल गिते, सेक्रेटरी विवेक सुभेकर, एमजेएफ यशवंत चित्रे तसेच प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला. यावेळी आशा वर्करसह आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
लायन्स क्लब नागोठणे मार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आशा वर्कर करीत असलेले महान कार्यांचा विवीध माध्यमांचा वापर करुन प्रत्येक खेडोपाडी याचा प्रचार व प्रसार व्हावा; यासाठी शुक्रवार 2 डिसेंबर रोजी नागोठणे व विभागासह रोहा तालुक्यातील आशा सेविकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात वैदय यशवंत चित्रे यांनी आशा सेविकांनी लहान लहान गावांमध्ये आरोग्य संबधीत काम करताना अनेक वैद्यकीय अडचणी येत असतात. त्यावेळी तातडीचे उपाय म्हणून काही घरगुती उपायांचे महत्व व त्याची सविस्तर माहिती देऊन ही सेवा सोयिस्करपणे कशी पुरवता येईल याबाबत योग्य मार्गदर्शन केले.डॉ.अनिल गिते यांनी आशा सेविका करीत असलेल्या कामांची दखल घेऊन त्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक करीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आभार मानले.
आपल्या प्रास्ताविकेत विवेक सुभेकर यांनी क्लबबद्दल माहिती व कॅम्पचे उद्दीष्ट सांगून आशा वर्कर यांचे कार्य लोकांपर्यत पोहचावे यासंदर्भातची माहिती विस्तृतपणे सांगीतली. यानंतर चार्टड प्रेसिडेंट प्रकाश जैन यांच्या आर्थिक सहकार्याने आशा सेविका, प्रा.आ. केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक अधिकारी आर.डी. हंबीर, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, आशा सेविकांचे विभागीय पदाधिकारी यांच्यासह लायन्स क्लबचे खजिनदार संतोष शहासने, डायरेक्टर सुजाता जवके, बुलेटीन इडिटर श्वेता सुभेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्रीकृष्ण पॅथॉलॉजीचे सागर कोकाटे,दीपिका पिंपळे व ज्योति कोलटकर यांचे मोलाच सहकार्य लाभले असून उपस्थितांचे संतोष शहासने यांनी आभार मानले.