कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील शेलू गावातील महिलांनी मुलींवर आणि लहान बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार याविरुद्ध एकजूट करीत लिंग आधारित हिंसेविरुद्ध कँडल मार्च काढून निषेध केला. त्याचवेळी महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांसाठी कायद्याची माहिती देणारे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सहेंगे नहीं कहेंगे लिंग आधारीत हिंसा के विरुद्ध अभियान साजरा केला.शेलु येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात बचत गटातील महिला यांना कायद्याची माहिती देणारे शिबीर आयोजित केले गेले.या शिबिरात महिलांना अँड.संदिप बागडे,अँड.अंकिता मसणे तसेच वैद्यकीय माहिती डॉ. रुपेश सोनावळे यांनी विस्तृत स्वरूपात दिली. तसेच पोलिसांच्या भारतीय दंड संहिता कायद्यातील तरतुदी यांच्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी बालकांवर घडणारे गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून आपल्या बालकांना पालकांनी योग्य संस्कार करावेत असे आवाहन केले.कर्जत पंचायत समिती बचत गटांच्या समन्वयक ललिता तेलवणे यांनी बचत गटांची चालवला आता मोठी झाली असौन समाजातील प्रत्येक महिलेचा सहभाग यात असावा यासाठी बचत गटांमधील महिलांनी त्या सर्व महिलांना बचत गटाचे महत्व पटवून द्यावे असे आवाहन केले.
त्यावेळी शेलू, बांधिवली आणि बेडिसगाव येथील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिला आणि ग्राम महिला गट यांचे पदाधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिरानंतर उपस्थित महिलांनी कर्जत पंचात समितीचे नेरळ विभाग समन्वयक मनोहर जाधव तसेच महिला बचत गटांच्या तालुका समन्वयक रेखा हिरेमठ,मसने आदिच्या नेतृत्वाखाली लिंग विरुद्ध हिंसेवर आधारित तिरंगा रॅली कँडल मार्च काढला.शेलू गावातून सर्व गल्ली बोळातून हा मोर्चा फिरला आणि त्यात तिरंगा रंगात गावातील वातावरण तिरंगामय झालेले दिसून आले.गावातील महिलांची या रॅलीला उत्स्फूर्त असा सहभाग होता.