कुठेही व कधीही मिळणारे व साधारण पणे १२ महिने उपलब्ध होणारे हे फळ आहे. लिंबाचे उत्पन्न पुष्कळ होत असल्याने भारतात याची लागवड सर्वत्र केली जाते. लिंबाचे झाड ८/१० फुट उंचीचे असते. या रोपांना ४/५ वर्षात फळे द्यायला सुरवात होते. थायलँड या देशातील कलम केलेली रोपे ३/४ फुट ऐवढीच उंच असतात, हि रोपे १ वर्षात फळे द्यायला सुरवात करतात. आपण कोणत्याही पदार्थात लिंबू आवडीने खातो. तसेच उन्हाळ्यात लिंबू सरबत हे आपल्या आवडीचं असत. परंतु लिंबाचे अजूनही फायदे आहेत. त्याचे महत्व जर आपण जाणून घेतले. तर आपल्याला अनेक आजारावर नियंत्रण ठेवता येते. कारण लिंबाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या अनेक आजारावर नियंत्रण ठेऊ शकते.
लिंबु आंबट असुनही बहूगुणी व उपयोगी फळ आहे. लिंबाचा रस रूचकर व पाचक आहे. लिंबु खुप गुणकारी फळ आहे. कच्चा लिंबु हिरवा व पिकलेला लिंबु पिवळ्या रंगाचा असतो.
शरिराचे आरोग्य रक्ताच्या शुद्धतेवर अवलंबुन असते. लिंबाच्या नियमीत सेवनाने रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. लिंबु पाचक रसांना उत्तेजित करतो. ज्यांचा जठराग्नी मंद आहे, त्याचा जठराग्नी प्रदिष्त होण्यास मदत होते. लिंबाच्या रसाचे सरबत करून नियमीत प्यायल्याने रक्तातील आंबटपणा दुर होतो. लिंबाचे लोणचेही केले जाते, असे लोणचे जेवणासोबत रूचकर लागते. लिंबाच्या सालीचे सेवन देखिल फायदेशिर आहे. त्याच्या सालीपासुन एक प्रकारचे सत्व काढता येते.
त्रिदोष, अग्नी, क्षय, वायुविकार, विष, मंदाग्नी, मलावरोध, कॉलरा, कृमी, किड, जखम सडणे, कुजणे, संसर्गजन्य रोग, रक्तदोष, त्वचारोग, उल्टी, ताप, पातळ संचास होणे, पित्तप्रकोप, मलेरिया, पित्तप्रकोप, खोकला, सर्दि इ. रोगांमध्ये लिंबु गुणकारी आहे.
लिंबाचा रस गुणकारी, रोगजंतुनाशक असल्याने स्त्री, पुरूष व लहान मुलांनी नियमितपणे रसाचे सेवन करायला हवे. लिंबाचा रसाच्या नियमित सेवनाने संसर्गजन्य रोग होत नाहीत. उपाशी पोटी रस प्यायल्यास उत्तम. लिंबातील आंबट पणामुळे उष्णतेपासुन रक्षण होते. उष्णतेपासुन होणाऱ्या इतर विकारात लिंबु गुणकारी आहे.
लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने आमाशय, पोट फुगणे, अपचन, करपट ढेकर, उदरशुळ, उल्टी, यांचा त्रास होत नाही. साल सेवन करणे कठिण आहे कारण तिची चव कडवट असते त्यामुळे लिंबाचे लोणचे, मुरंबा सेवन करावा.
लाळ गळत असल्यास लिंबु कापुन (बारीक तुकडे) करून त्याला मीठ, मीरे, सुंठाचे चुर्ण घालुन उन्हात ठेवावे. ७/८ दिवस उन्हात ठेवुन मग ते खाल्यानेे लाळ गळणे बंद होते. लिंबावर सैंधव घालुन चोखल्याने अजिर्ण होत नाही. लिंबाच्या रसात साखर घालुन प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. लिंबाच्या रसा दर ४ तासाने घेतल्यास आमवात व रक्तपित्त दुर होते. दातातुन रक्त येत असेल तर लिंबाच्या रसाच्या गुळण्या कराव्यात.
लिंबाचा रस नियमीत प्यायल्याने घश्याचा त्रास कमी होतो. लिंबाचा व आल्याचा रस समप्रमाणात घेतल्यास पोटदुखी थांबते.
जुनाट सर्दि असेल तर गरम पाण्यात लिंबाचा रस घालुन प्यायल्याने सर्दि नाहीशी होेते. हा प्रयोग किमान १ वर्ष तरी करावा. रस रोज प्यायल्यास सर्दि नक्कि बरी होते.
लिंबू हे अजीर्णावर अतिशय फायदेशीर आहे. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे. आणि ते वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी हा त्रास कमी होईल. तुम्हाला जर उलट्या होत असतील. तर त्यावर खडीसाखर टाकून लिंबू चोखले तर उलट्या कमी होतील.तुम्हाला जर वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही आल आणि लिंबाच्या रसात साखर घालून ते पिलात तर तुमची पोटदुखी थांबेल.
पित्त होत असेल तर रोज लिंबाचे सरबत घ्या त्याने भूक वाढते. खाल्लेलं अन्न पचत आणि शौचास साफ होते. त्यामुळे तुम्हाला पित्तापासून आराम मिळतो. अचानक उचकी येत असेल तर वाळलेले लिंबू मधात घालून चाटले तर उचकी थांबते.
अंगाला जर खाज येत असेल तर लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा गरम पाण्याने अंघोळ करावी. खाज कमी होईल.
लिंबाच्या फोडीत काळं मीठ भरून चोखण्याने मूळव्याधीत होणारं रक्तस्त्राव बंद होतं.खोकला किंवा खूप सर्दी झाली असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चमचे मध मिसळून चाटावे. एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून, त्यात काळं मीठ टाकून सकाळ- संध्याकाळ दोनदा नियमित एक महिना पिण्याने मूत्रखडा विरघळून जातो.
लिंबाचे सालीचे उपयोग….…
१) लिंबाचे साल जोड्यावर घासून काही वेळ उन्हात ठेवून द्या. याने जोड्यांना चमक येईल.
२) फ्रीजमध्ये लिंबाचे साल ठेवल्याने वास दूर होतो.
३) लिंबाचे साल दातावर घासल्याने पिवळेपणा दूर होतो.
४) जिथे मुंग्या होत असतील तिथे लिंबाचे साल घासल्याने मुंग्या पळतात.
५) लिंबाच्या सालावर बेकिंग सोडा टाकून हे हाताच्या कोपऱ्यावर घासावे. यामुळे काळपटपणा दूर होतो.
६) लिंबाचे साले कापून त्यात दूध, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळून पायाच्या टाचा स्वच्छ करा.
७) लिंबाच्या बियांमध्ये सेलिसिक अॅसिड असतं. हे सीमित मात्रेत खाल्ल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते.
८) कपड्यावरील डाग मिटवण्यासाठी लिंबाचे साल त्यावर घासून रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी डाग स्वच्छ होऊन जातील.
९) करपलेल्या भांड्यांचा तळ स्वच्छ करण्यासाठी लिंबू वापरता येईल. या भांड्यांमध्ये लिंबू वापरता येईल. या भांड्यांमध्ये थोडं पाणी उकळत ठेवा. त्यात लिंबू घाला. भांडी स्वच्छ होतील.
१०) लिंबू घासल्याने तांब्याची भांडी चमकतात.
११) शर्टचा पांढरेपणा टिकवून ठेवण्यासाठी तो काही काळ लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवा.
१२) हाताचा तेलकटपणा आणि ग्रीस घालवण्यासाठीही याचा वापर करता येईल.
….. Dr. Sameer B Pandit
M.D. (A.M.)
(हे केवळ आपल्या माहिती साठी आहे, परंतु हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)