माणगांव (रविंद्र कुवेसकर) : माणगांव मोरबा रोड जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या प्रसिद्ध दी निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या सहसंचालिका सौ. लिना निलेश शेट यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सची ॲडव्हायझर होऊन, अवघ्या दहा महिन्यां मध्ये एम.डी.आर.टी.२०२३ साठी, आवश्यक असणारे लक्ष पूर्ण करून, कोंकण विभागामध्ये आपल्या पदार्पणातच MDRT(USA ) मानांकन दर्जाची कामगिरी पार पाडणारी पहिली महिला असा नवा विक्रम नविन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच नोंदवत, ३२ लाख ९१ हजार रुपये असा प्रथम विमा हप्ता पूर्ण करून, आपल्या सर्वांसमोर स्वावलंबी सक्षम महिला म्हणुन एक आदर्श ठेवला आहे. लिना निलेश शेट, हया वाणिज्य शाखेच्या पदवीधर असुन माणगांव पोस्टऑफिस मध्ये स्वल्पबचत (आरडी) प्रतिनिधी म्हणून देखिल गेली अनेक वर्ष काम करतात. अनेक महिला मंडळातही त्या हिरहिरिने कार्य-मग्न आहेत.
आपल्या हसमुख मनमिळावू स्वभावामुळेच त्यांनी MDRT(Million Dollar Round Table) USA. मानांकन कामगिरी करुन गौरवाचे पान लिहिले आहे. बदलत्या काळाबरोबर बचतीच्या संकल्पना विस्तारित झालेल्या असून त्याला अनुसरून त्यांनी ४६ व्या वर्षी सिबीडी बेलापूर येथे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ॲडव्हायझरीची स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन बचतीच्या वेगवेगळ्या प्रकारची दालन गृहिणी वर्गाला उपलब्ध करून दिली आणि अवघ्या दहा महिन्यातच हे मानांकन प्राप्त करणारी कोकण रिजन मधील पहिली पदार्पणवीर महिला असा गौरव प्राप्त केला आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
त्यांच्या या उत्तुंग यशामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शिवसेना नेते एडवोकेट राजीव साबळे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकरजी उभारे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, नगरसेवक दिनेश रातवडकर, रविंद्र मोरे, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, स्वीकृत नगरसेवक हेमंतभाई शेट, संजय जुईकर, विजयभाई मेथा, कोकण रेल्वे अभियंता दिनेश विंचूरकर, लोणेरे ग्रामिण पतपेढीचे चेअरमन संजय घोसाळकर, देगांव सरपंचा सुषमा नितीन वाघमारे, नवरात्र मित्र मंडळ माणगांव अध्यक्षा सुजाता शेट, नीता सुभाष शेठ, कोकण विशानेमा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भाई गांधी,
मुंबई परिसर विशानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष शरदभाई नथुराम दोशी, भूपेंद्र गांधी, संजय भाई शेठ (कळवा), रायगड भूषण यशवंतराव गायकवाड, महाराज, रायगड भूषण दादा महाराज शिंदे, रायगड भूषण शांताराम खाडे महाराज, गोरक्षनाथ मंदिर ढालघर फाटा नाथ संप्रदाय, आदर्श महिला मंडळ माणगांव आदींनी विशेष अभिनंदन केले. त्यांच्या या यशामध्ये ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स महाड शाखेचे डेव्हलपमेंट ब्रांच ऑफिसर योगेश वामन जोशी, चिपळूण-महाड ब्रांच मॅनेजर अमित मिरगांवकर, कोकण रिजनचे असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट अभिजीत सरदेसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.