बेरूत : लेबनानची राजधानी बेरूत मंगळवारी जबरदस्त बॉम्ब स्फोटाने हादरली. या स्फोटात 73 लोक मृत्युमुखी पडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच 3700 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले. घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
बेरूतच्या पोर्ट भागत झालेल्या या स्फोटाचा धक्का शहराच्या बहुतांश भागात जाणवला आणि काही ठिकाणी वीज सुद्धा गेली. स्फोटानंतर मलब्यात अडकलेल्या दोन लोकांची छायाचित्रे स्थानिक मीडियाने जारी केली असून यामध्ये रक्ताने माखलेले लोक दिसत आहेत. तुटलेल्या खिडक्या, अत्यावस्थ पडलेले फर्निचर आणि तुटलेले सिलिंग दिसत आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही