लॉकडाऊन काळात नियम उल्लंघनप्रकरणी राज्य सरकारचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय घेतला 

lokmat

मुंबई : गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल करण्यात आले. अशाप्रकारे ५९,८०० खटले दाखल करून गुन्हेही दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. जमावबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे तसेच भादंवि कलम १८८ अन्वये खटला दाखल करून दंड आकारणी करण्यात येत होती. यातील बहुतांश नागरिकांनी दंडाची रक्कम भरली. मात्र बहुतांश जणांनी दंड भरलेला नाही. हे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याने या दंड न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.