‘लॉकडाऊन’मध्ये सायबर गुन्हेगार मोकाट

    पेण : कोरोनाच्या संकटामूळे देशातील  उद्योगधंदे व्यवसाय अडचणीत आलेत . वाढती बेरोजगारी  गुन्हेगारी क्षेत्रातील संख्या वाढीस  कारणीभूत आहे. चोऱ्या- दरोडे यासारख्या लहान गुन्ह्याबरोबरच काहींनी फसवणूक करण्याचा मार्ग निवडलेला आहे. ऑनलाईन  मालाच्या विक्रीच्या निमित्ताने ग्राहकांना गंडा घालणे, बँकांचे अकाउंटची गोपनीय माहिती मिळवून  रक्कम हडप करण्याचा नवा फंडा वापरून फसवणूक केली जात आहे.
   सायबर गुन्ह्यात मुले, महिलांप्रमाणेच उच्चशिक्षित लोकही या गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.  समोरच्याने पाठवलेली  लिंक कोणत्याही प्रकारचा विचार न करता . क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा बँक खात्या विषयीची माहिती समोरच्याला सहजगत्या देतात. त्यांची फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात येते. आणखी एक प्रकार म्हणजे बँक किंवा फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास सरकारने काही महिन्यांची सवलत दिली. मात्र हे गुन्हेगार आपण बँकांचे अधिकारी असल्याचे भासवून कर्ज प्रोसिजरसाठी पीन, सी. व्ही. व्ही. आदींची माहिती मागतात. बँकांचे नावाने खोट्या लिंक, खोटे मेसेज कर्जदारांना पाठवून त्यांच्या खात्यातील रक्कमेवर डल्ला मारतात. अश्या प्रकारचा कोणताही फोन किंवा मेसेज आला तर रिसिव्हर करणे टाळावेत.
    गुन्हेगारी प्रवृत्तीची ही लोकं चारही बाजूने डोंगर, दर्या , नदी, नाले असलेल्या दुर्गम भागात आश्रय घेतात. गुन्हेगार नेहमीच उपाशी अथवा गरजू असतो .गुन्हा करण्याची त्याला सवय जडून  व्यसनात रूपांतर होते. गुंतागुंत, धावपळ, विस्कळीतपणा आणि अनामिकता या कारणामुळे गुन्हेगारी बळावते.  शासन करण्यामध्ये  शिथिलता आणि भोंगळपणा यामुळे गुन्ह्याची दखल घेतली जात नाही. गुन्हेगारांना जिथे सुरक्षितता वाटते तिथे सर्वसामान्यांना भय वाटणे साहजिकच आहे.
    देशभरात सूरु असलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे बहुतांशी लोक घरात बसूनच आपली दैनंदिन कामे, आर्थिक व्यवहारान्ंना  प्राधान्य देत आहेत. हीच संधी समजून गुन्हेगार आपला कार्यभाग साधतात. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार अलिकडे फारच वाढलेले आहेत. भौगोलिक , अशांत सामाजिक वातावरणातील नागरी व ग्रामीण भागात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत असते. आणि सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पोलिसांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे.