पनवेल (संजय कदम) : खान्देश्वर ते मानसरोवर दरम्यान लोकल गाडीतून पडुन एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.
खान्देश्वर ते मानसरोवर दरम्यान लोकल गाडीतून एका अज्ञात तरुणाचा स्टेशन कि.मी. नं. ४४/१०,४४/११ चे जवळ कोणत्यातरी अज्ञात लोकल गाडीतून पडुन जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
सदर तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत असून तरुणाविषयी काही माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२-२७४६७१२२ किंवा सहा.पोलीस निरीक्षक बी.व्ही.दोडमिसे मो.९४९४९१२२९४ यांच्याशी संपर्क साधावा.