पनवेल (संजय कदम) : लोखंडी सळ्यांचा अपहार करणारे चार आरोपीना गजाआड गुन्हे शाखा कक्ष -२ पनवेल च्या पथकाने गजाआड केले असून त्याच्या कडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
ट्रेलर ड्राइव्हर सुनील यादव ( वय २३ ) याच्या ताब्यात जवळपास ३६ लाख रुपये किमतीचा माल देण्यात आला होता. सदर माला पैकी ९६० किलो लोखंडी सळ्या ज्याची किंमत ६२४००/- रुपयांचा मालाचा सुनील यादव यांच्यासह आरोपी यार मोहंमद आस मोहंमद खान ( वय ३४ ), सचिन खोत ( वय ३७) , व रुद्रप्रसाद मुरली चौधरी ( वय ५४ ) यांनी मॊजे करंजाडे गावचे हद्दीतील पळस्पे ते जेएनपीटी अश्या जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक ४ बी वरील निलेश ढाबा येथील मोक्या जागेत अपहार केला.
याबाबत ची तक्रार गुन्हे शाखा कक्ष -२ पनवेल येथे येताच वपोनि रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे ,पोहवा. अनिल पाटील, तुकाराम सूर्यवंशी, राहुल पवार, अजित पाटील, दीपक डोंगरे व रुपेश पाटील आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहिती नुसार व तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे .