वसई : वसईत कोरोना रूग्णाला घेऊन जाणार्या अॅम्ब्युलन्सला पापडीच्या स्टेटस हॉटेल समोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. वसई-विरार महापालिकेची ही अॅम्ब्युलन्स रुग्णाला उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी निघाली होती. सुदैवाने चालक आणि रूग्ण दोघेही बचावले आहेत.
नालासोपारा येथील एका कोरोना रुग्णाला उपचारासाठी वसईच्या जी. जी. कॉलेज येथील कोविड सेंटरमध्ये ही अॅम्ब्युलन्स निघाली होती. स्टेटस हॉटेलजवळ अॅम्ब्युलन्स येताच तिचा एक्सेल तुटला आणि गाडी डाव्या बाजूच्या खांबावर धडकली. अॅम्ब्युलन्समधील रूग्ण आणि आणि चालक दोघेही बचावले आहेत. रूग्णाला दुसर्या अॅम्ब्युलन्सने तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. अपघातात अॅम्ब्युलन्सचे नुकसान झाले आहे.