वांगणी हायस्कूलच्या वतिने अंबा नदिजवळ जागतिक पाणथळ दिन साजरा

dinesh5

सुकेळी (दिनेश ठमके) : नागोठणे जवळील सु. ए. सो. चे. माध्यमिक विद्यालय वांगणी हायस्कुलच्या वतिने येथुन जवळच असलेल्या अंबा नदिच्या निसर्गरम्य परिसरात जागतिक पाणथळ दिन मंगळ दि. 2 फेब्रु. 2021 रोजी साजरा करण्यात आला.

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र रोहा व सु. ए. सो. चे. माध्यमिक विद्यालय वांगणी (स्थळ- बाळसई) यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कुलजवळील अंबा नदिच्या निसर्गरम्य परिसरात जागतिक पाणथळ दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामाजिक वनीकरण रोहा विभागाचे वनक्षेत्रपाल श्री.संजय पांढरकामे , रोह्याचे वनाधिकारी श्री.पी.एम्.पवार , कोलाडचे वनाधिकारी श्री.एस्.पी.जाधव , वांगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे.एम्.ठाकूर , रोहा वनरक्षक श्री.सागर पाटील, वागणी हायस्कूलचे हरितसेनाप्रमुख व विज्ञानशिक्षक श्री.टिळक खाडे, जेष्ठ शिक्षक श्री.ए.एन्.शेळके,  श्री.व्ही.ई.म्हात्रे, वनकर्मचारी श्री.सुरेश वाघमारे आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिका-यांनी विद्यार्थ्यांना पाणथळ जागांचे महत्व, कमी होत चाललेले जलसाठ्यांचे क्षेत्र, जलीय परिसंस्था, उभयचर प्राण्यांमध्ये असलेली पाणथळ जागांची भूमिका आदी विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली व विद्यार्थ्यांना पाणथळ जागांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन केले.