बोर्लीपंचतन (मकरंद जाधव) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किल्ले मदगडाच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे गावच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा फडकला असून थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले येथील ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम उर्फ आबा गायकर यांनी नववर्षाच्या सुरवातीलाच मंगळवार दि.२ जानेवारी रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला तर श्यामराव जाधव यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी घेतलेली मेहनत व ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मी या निवडणूकीत विजयी झालो असून मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन मी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचीत सरपंच आबा गायकर यांनी यावेळी सांगीतलं.
निवडणूकीतल्या त्यांच्या विजयाने वंदनीय बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दिसून आलं.याप्रसंगी तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर,उपतालुकाप्रमुख सचिन गुरव व एजाज हवालदार संपर्क प्रमुख अरुण देवकर,बोर्ली विभागप्रमुख रमेश कांबळे,अल्पसंख्यांक सेल रायगड अध्यक्ष मकसूद दर्जी,बोर्लीपंचतन शाखाप्रमुख गजानन भाटकर,उपशाखा प्रमुख रिजवान मांडलेकर,गट प्रमुख शिवकुमार निषाद, संघटक गजानन कदम, वांजळे शाखाप्रमुख उदय लटके, उपशाखाप्रमुख प्रितम दिवेकर यांनी सरपंच,उपसरपंच व ग्रामविकास आघाडीचे नवनिर्वाचीत सदस्य त्याचबरोबर उपस्थित ग्रामस्थ यांचे अभिनंदन करुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या हातून भरीव कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या.