सुकेळी (दिनेश ठमके) : सद्यपरिस्थितीत मुंबई -गोवा महामार्गावर तसेच वाकण-पाली मार्गावर मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जणु काही या गुरांनी रस्त्यावर रास्ता रोकोच केला आहे. रस्त्यावरील वाढत्या मोकाट गुरांच्या संख्येमुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मोकाट गुरांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे या गुरांना कोणी वाळी आहे की नाही. की ही गुरे अशीच रस्त्यावर मोकाट सोडुन देण्यात आली आहेत. असा प्रश्न उभा राहीला आहे. या गुरांचे कळपच्चा कळप रस्त्यावर ऊभे असतात यांच्यामागे कोणीच गुराखी वैगरे दिसुन येत नाहीत. तसेच वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ताच मोकळा नसल्यामुळे गाडीचा हाँर्न वाजवुन सुद्धा गुरे बाजुला होत नाहीत. शेवटी वाहनचालकाला गाडी ऊभी करुन गाडीतुन ऊतरुन गुरांना बाजुला करावे लागत आहे. तसेच या उनाड गुरांच्या रस्त्याच्या मधेच बरेच वेळा झोंब्या होत असतात. या झोंब्यामुळे अनेक गाड्यांना अपघात होऊन गाडीचे शो, क्लज,इंडिकेटर पुर्णपणे तुटुन वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना बरेच वेळा घडल्या आहेत.