नागोठणे (महेंद्र माने) : स्वराज क्रिकेट क्लब जोगेश्वरीनगर आयोजित विनायक गोळे मित्र मंडळ व नागोठणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरस्कृत नागोठणे नाईट अंडर आम क्रिकेट असोसिएशन मर्यादित भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे विजेते पद ज्वाला खडकआळी,नागोठणे यांनी पटकावले.
या स्पर्धेचे रा.काँ. जेष्ठ नेते शिवराम शिंदे,रा.काँ.पेण सुधागड मतदार संघ उपाध्यक्ष विलास चौलकर, रा.काँ. जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी पिगोंडे सरपंच तथा रा.काँ.विभागीय अध्यक्ष संतोष कोळी कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, ग्रा.पं.सदस्य अकलाक पानसरे व राजेश पिंपळे, चंद्रकांत गायकवाड, विभागीय युवक उपाध्यक्ष दिनेश घाग यांच्यासह अविनाश बामणे, मधुकर महाडिक, कुणाल तेरडे तसेच रा.काँ.चे कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – ज्वाला खडकआळी A,द्वितीय क्रमांक – कानिफनाथ मराठाआळी B, तृतीय क्रमंक – ओम साई खडकआळी तसेच चतुर्थ क्रमांक – कानिफनाथ मराठा आळी A यांनी पटकावला. तसेच या स्पर्धेत मालिकावीर – निलेश पिंपळे (ज्वाला खडक आळी A),सामनावीर – निलेश पिंपळे (ज्वाला खडक आळी A),उत्कृष्ट फलंदाज – सुमित जाधव (कानिफनाथ मराठा आळी B),उत्कृष्ट गोलंदाज – स्वप्नील भोसले (कानिफनाथ मराठा आळी A),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – स्वराज जोशी (ज्वाला खडक आळी A) यांना देण्यात आले असून विजयी संघाला व विशेष खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते भव्य चषक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विनायक गोळे मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.