विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने आपल्या जोरावर आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेत पराभूत होण्यापासून संघाला वाचवले तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. असे म्हटले जाते की स्टोक्स जेव्हा मैदानावर उपस्थित असेल, तेव्हा संघाला यश मिळवूनच परततो.

परंतु असे जरी असले, तरी स्टोक्सच्या या क्षमतेमुळे त्याची पत्नी क्लेअर रॅट्क्लिफने जेव्हा स्वतःचे वर्णन स्टोक्सची पीए म्हणून केले होते, तेव्हा तिने स्वत: ला ‘क्रिकेट विधवा’ असल्याचे सांगितले होते.

स्टोक्स आणि क्लेअर लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांनीही २०१३ साली साखरपुडा केला आणि त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी लग्न केले. स्टोक्सच्या प्रत्येक कठीणसमयी त्याची पत्नी त्याच्यासोबत उभी राहिली आहे. क्लेअर प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करते आणि तिला तिचे आयुष्य खाजगी ठेवायचे असते.

मागील वर्षी सोशल मीडियावर तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले होते. खरंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये स्टोक्स तिचा गळा दाबत असल्याचे दिसत होते आणि त्याच्यावर आरोपही करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने स्टोक्सची बाजू घेत स्पष्टीकरण दिले होते.

स्टोक्सने इंग्लंड संघाकडून ६६ कसोटी, ९५ वनडे आणि २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ४४१९, वनडेत २६८२, आणि टी२०त ३०५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना कसोटीत १५६, वनडेत ७०, आणि टी२०त १४ विकेट्स घेतल्या आहेत