मुंबई : सध्या राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल केले आहे. सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. तर प्रताप दिघावकर यांची नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलीस दलातील बदल्यांबाबत चर्चा सुरू होती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा तपशील (कंसात कुठून कुठे बदली झाली)
1. राजेंद्र सिंह (अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई ते अपर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महासंचालक कार्यालय, मुंबई) 2. आशुतोष हावरे (अप्पर पोलिस महासंचालक, अँटी करप्शन विभाग, मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
2, अमितेश कुमार ( सह आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई ते पोलिस आयुक्त नागपूर, शहर पध्ततीने)
3, जय जीत सिंह (अप्पर पोलिस महासंचालक,रेल्वे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अप्पर महासंचालक, अन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
4.. व्ही. के. चौबे (सह पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई शहर ( अप्पर पोलिस महासंचालक दी) ते अप्पर पोलिस महासंचालक, अन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई)
5. सदानंद दाते (केद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आल्याने प्रतिक्षाधीन ते पोलिस आयुक्त, मीरा – भाईंदर, वसई – विरार )
6.बिपिन कुमार सिंह (अप्पर पोलिस महासंचालक, अॅन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई)
7. डॉ.जय जाधव (संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मंबई ते सह आयुक्त, नवी मुंबई – सध्याचे आयजी श्रेणीमध्ये पद उपमहानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून)
8. निसार तांबोळी (पोलिस उपमहानिरीक्षक व दक्षता अधिकारी, सिडको ते विशेष महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र – सध्याचे पद महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून)
9. चंद्र किशोर मिना (सदादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 8, मुंबई ते विशेष महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, सध्याचे पद अवनत करून)
10. संजय दराडे (पोलिस उपमहानिरीक्षक, दक्षता अधिकारी, विक्रीकर विभाग, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व विभाग, पोलिस आयुक्तालय, मुंबई शहर)
11.विरेश प्रभु (अप्पर आयुक्त, मध्य विभाग, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, गुन्हे, मुंबई)
12. सत्य नारायण (पोलिस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी, सिक्युरिटी, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई शहर)
13. ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, मध्य विभाग, मुंबई शहर)
14. नामदेव चव्हाण (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना ते अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, पुणे – पदोन्नतीने)
15. आरती सिंह (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर – पदोन्नतीने) 19. संदीप कर्णिक (अप्पर आयुक्त, गुन्हे, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग, मुंबई शहर)
16. एस. एच. महावरकर (अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर ते पोलिस उपमहानिरीक्षक व दक्षता अधिकारी, सिडको)
17. लक्ष्मी गौतम (अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व विभाग ते महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई)
18. एस. जयकुमार (अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस बल, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, मिरा भाईदर वसई विरार, पोलिस आयुक्तालय)
19. संदीप बी. पाटील (पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र नागपूर – पदोन्नतीने)
20. विरेंद्र मिश्रा (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस बल, मुंबई शहर पदोन्नतीने)
21. प्रताप दिघावकर, (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, पोलीस महासंचालक, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक)