“मानसी.. तू ना.. अगदी कोणावरही सहज विश्वास ठेवतेस..! किती गं भोळी तू…!”
राजेशचं हे वाक्य मानसीला आज खुप आठवत होतं…
एक वर्षा पूर्वी राजेश मानसीला भेटला होता.. एकत्र काम करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.. राजेश मानसीला खुप जपायचा. तिची काळजी घ्यायचा.. आणि त्याचा हा स्वभाव मानसीला फार आवडायचा.. दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला..
लग्नाची तारीख ठरली.. पत्रिका निवडल्या गेल्या.. सगळं अगदी स्वप्नवत वाटत होतं मानसीला..
राजेश ही आनंदी होता…
आणि लग्न ठरलंय, त्यात प्रेम विवाह…! दोघे ही आनंदात होते.. आणि राजेशने मानसीच्या जवळ गेला.. मानसीनेही त्याला लग्ना आधीच नवऱ्याचे स्थान दिले होते.. त्यामुळे तिने हरकत घेतली नाही.. दोघे ही एकमेकांच्या जवळ आले..
राहुल त्याच्या मित्रांना भेटून घरी गेला.. पण त्याच्या मित्राचे एकच वाक्य त्याच्या डोक्यात सारखे फिरत होते… “लग्नाआधीच जर ती तुझ्या जवळ येऊ शकते.. तर ती ह्या आधी ही कोणाच्याही जवळ गेलेली असु शकते…!!!”
त्याच्याशी भांडुन राजेश घरी आला खरा.. पण त्याच्या मनातली मानसीबद्दलच्या विश्वासाची जागा आता शंकेने घेतली होती…! घरी येऊन त्याने मानसीच्या घरच्यांना फोन करून लग्न मोडत असल्याचे कारण कळवून टाकले.. ! मानसी आणि तिच्या घरचे अजूनही मानसिक धक्क्यात आहेत..
मानसी त्याचं बोलणं आठवून विचार करतेय… “नक्की कोणावरही विश्वास कोण ठेवतंय?”
असे अनेक प्रसंग आयुष्यात घडतात जेव्हा माणसे एखाद्या व्यक्तिच्या बोलण्याने – ते ही अशी व्यक्ति जिला आपल्या पर्सनल लाईफ बद्दल, आपल्या जवळच्या व्यक्तिबद्दल काहीच माहीत नसते.. पण ते बोलून जातात.. आणि अशा वेळी आपण ज्या व्यक्तीला पूर्ण ओळखतो, त्या व्यक्ति बद्दल मनात आढी धरून ठेवतो… ह्याचं – त्याचं ऐकून मनात धरून ठेवतो… आणि असलेलं सुंदर नातं गमावून बसतो…
अशा वेळी आपण मनाचा कौल घ्यायला हवा.. आपल्याला त्या व्यक्तिचा आलेला अनुभव आणि एखाद्या व्यक्तीचे त्या व्यक्तिबद्दलचे मत ऐकून आपण स्वतः ठरवायला हवे.. की कोणावर विश्वास ठेवायचा.. आणि किती विश्वास ठेवायचा.. !
त्यामुळे आयुष्य आणि नाती खुप सुंदर होतील.
– के. एस. अनु